German Official On Naval Exercise : भारत आणि जर्मनी मिळून जग सुरक्षित करू इच्छितात !
जर्मनीच्या नौदलाचे अधिकारी रिअर अॅडमिरल हेल्गे रिश यांचे विधान
नवी देहली – भारत आणि जर्मनी हे लोकशाही देश असून चांगले भागीदार आहेत. दोन्ही देशांना मिळून जग सुरक्षित करायचे आहे, असे जर्मनीच्या नौदलाचे अधिकारी रिअर अॅडमिरल हेल्गे रिश यांनी म्हटले आहे. हेल्गे रिश ‘जर्मन फ्रिगेट टास्क फोर्स ग्रूप’चे कमांडर आहेत.
India and Germany together want to secure the world
Statement by German Naval Officer Rear Admiral Helge Risch
Read more : https://t.co/e7NToCtSYM#GepPolitics #MaritimeSecurity pic.twitter.com/yNmH3STr6L
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 29, 2024
रिश म्हणाले की, दोन्ही देश लोकशाहीवादी आहेत. आमची अनेक मूल्ये आणि स्वारस्ये हीसुद्धा सामायिक आहेत. आम्ही दोघेही प्रादेशिक पातळीवर जोडलेले आहोत; पण जागतिक पातळीवरही वचनबद्ध आहोत. दोन्ही देश आणि त्यांच्या नौदलांमधील मैत्री अन् भागीदारी अधिक दृढ करण्याचा हा प्रयत्न आहे. येत्या काळात आणखी सराव करू; पण त्याविषयी आताच काही बोलणे योग्य नाही. मला वाटते की, आपल्या देशांच्या सरकारांनी यावर चर्चा केली असेल.