लक्ष्मी भगवान श्री हरीचे पाय का दाबत असते ?
एका पौराणिक कथेनुसार, एकदा नारदजींनी लक्ष्मीला विचारले, ‘तू श्री हरीचे पाय का दाबत आहेस ?’ देवी लक्ष्मी म्हणाली, ‘मानव असो वा देव, ग्रह सर्वांवर परिणाम करतात. देवगुरूंचा वास स्त्रियांच्या हातात असतो, तर रक्षागुरु शुक्राचार्यांचा वास पुरुषांच्या पायात असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा स्त्री पुरुषाच्या पायांना स्पर्श करते तेव्हा देव-दानव भेटतात आणि आर्थिक लाभ होतो.’ यामुळे देवी लक्ष्मी श्री हरीचे पाय दाबते. मत्सर, लोभ, आळस, क्रोध आणि अपवित्रता या ठिकाणी असणारी अलक्ष्मी पायाजवळ येऊ नये म्हणून माता लक्ष्मी पतीच्या पायांची धूळ नेहमी काढत असते.
(संदर्भ : ‘तरुण भारत’)