अभ्यंगस्नानाचे महत्त्व !
१. पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान ! स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृतावस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. त्यामुळे या पोकळ्या चैतन्य ग्रहण करण्यासाठी संवेदनशील बनतात. अभ्यंगस्नान केल्याने सत्त्वगुण संवर्धनाकडे वाटचाल होत असल्याने नित्य अभ्यंगस्नान केल्याने लाभ होतो; म्हणजेच जिवाचा अभ्युदय होतो.
२. तेलाच्या त्वचेवरील घर्षणात्मक मर्दनाने देहाची सूर्यनाडी जागृत होऊन पिंडातील चेतनेलाही सतेज बनवते. ही सतेजता देहातील रज-तमात्मक लहरींचे विघटन करते. ही एकप्रकारची शुद्धीकरणप्रकियाच आहे. चैतन्याच्या स्तरावर घडलेल्या शुद्धीकरणप्रक्रियेने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व प्राप्त झाल्याने जिवाचे प्रत्येक कर्म हे साधना म्हणून घडते. अभ्यंगस्नानातून निर्माण झालेल्या चैतन्याच्या स्तरावर घडणारी प्रत्येक कृती जिवाच्या हातून साधना म्हणून झाल्याने या कृतीमुळे वायूमंडलाचीही शुद्धी होते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र)