बांधवांनो, लक्षात ठेवा : आपला उत्सव..आपली खरेदी.. आपली माणसं !

भारतातील १०० कोटी हिंदु ग्राहकांच्या अधिकारांचा सन्मान करा !

शरीयत आधारित ‘इस्लामिक बँके’ला अनेक देशांत विरोध झाला; मात्र ग्राहक अधिकार, तसेच कट्टर धर्मपालनाचा आग्रह यांमुळे ‘हलाल अर्थव्यवस्था’ आज पुष्ट होतांना दिसत आहे. जगभरात आज ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा उघडपणे आणि मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत ‘वाढत्या कट्टरतावादासाठी ‘हलाल अर्थव्यवस्था’ बळ पुरवत आहे’, असा आरोप करण्यात आला असून तिच्यावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. भारत शासनाने ‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्‍या इस्लामी संस्था ‘प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून गोळा केलेल्या धनाचा कसा वापर करतात ?’, याची सखोल चौकशी केली पाहिजे. भारतातील १०० कोटी हिंदु ग्राहकांच्या अधिकारांचा सन्मान होण्यासाठी हे होणे आवश्यक आहे.

भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण (एफ्.एस्.एस्.आय.)कडून चाचण्या करून पदार्थ शाकाहारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते. इस्लामी संस्थांना असे प्रमाणपत्र देण्याचा कोणताही अधिकार किंवा मान्यता दिलेली नाही; मात्र इस्लामी संस्थांच्या अवैध कृत्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारत शासनाच्या अत्याधुनिक ‘पंथनिरपेक्ष प्रयोगशाळे’पेक्षा इस्लामी संस्थेचे ‘हलाल प्रमाणपत्र’ सर्वाेच्च बनले आहे. भारतातील विज्ञान-आधारित व्यवस्थेचा हा अपमान नाही का ?

(संदर्भ : हिंदु जनजागृती समितीकृत ग्रंथ ‘हलाल जिहाद’)


हिंदु ग्राहकाला ‘अन्नाचा धर्म नसतो’, असे सांगणे; मात्र मुसलमान ग्राहकाला ‘हलाल’ पद्धतीने अन्न न देऊ शकल्याने पैसे परत करणे, हा ‘झोमॅटो’चा पक्षपातीपणा !

३०.७.२०१९ या दिवशी मध्यप्रदेशातील जबलपूर येथील पंडित अमित शुक्ल यांनी श्रावणाच्या पवित्र मासात ‘झोमॅटो’ या खाद्यपदार्थ घरी पोचवणार्‍या आस्थापनाकडे मागणी नोंदवली. त्यांना खाद्यपदार्थ घेऊन येणारी व्यक्ती मुसलमान असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी श्रावणाचे व्रत असल्याचे कारण देऊन दुसर्‍या व्यक्तीला पाठवण्याची विनंती केली. ‘झोमॅटो’ने त्यांची विनंती नाकारली आणि पैसे परत देण्यासही नकार दिला. त्यामुळे पं. शुक्ल यांनी ‘झोमॅटो’ला त्यांची मागणी रहित करून पैसे परत करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले; परंतु पं. शुक्ल यांनी मुसलमान वितरकाला नकार देऊन धर्माच्या आधारे भेदभाव केला म्हणून ‘सेक्युलर’वाद्यांकडून मोठ्या प्रमाणात थयथयाट केला गेला. ‘झोमॅटो’च्या मालकांनी ‘अन्नाचा धर्म नसतो. अन्न हाच धर्म आहे’, असे तत्त्वज्ञान सांगणारे ‘ट्वीट’ केले. या सर्व दबावामुळे जबलपूर पोलिसांनी पं. शुक्ल यांना नोटीस बजावली. याच ‘झोमॅटो’कडे वाजिद अब्दुल नावाच्या मुसलमान व्यक्तीने खाद्यपदार्थाची मागणी नोंदवली; मात्र ते पदार्थ इस्लामनुसार ‘हलाल’ नसल्याचे कळल्यानंतर त्याने ती मागणी रहित करण्यास सांगितले. त्यावर ‘झोमॅटो’ने स्वतःहून त्याची मागणी रहित केली. त्यानंतर ‘झोमॅटो’ने ‘हलाल प्रमाणपत्र’ असणार्‍या ‘हॉटेल्स’ची माहिती देण्यास प्रारंभ केला. (संदर्भ :  ग्रंथ ‘हलाल जिहाद’)