पनवेल येथील घरातून पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त !
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल आणण्यासाठी राजस्थानला गेलेल्या राम कनोजिया याच्या पनवेल येथील घरातून पोलिसांनी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपी भाडेतत्वावर येथील घरात रहात होता. या प्रकरणी न्यायालयाने ९ आरोपींच्या पोलीस कोठडीत २६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.