पुणे जिल्ह्यांतील ३८ मतदान केंद्रे दुर्गम भागात : भ्रमणभाष नेटवर्कही नाही !
दूरसंचार आस्थापनांनी नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची सूचना !
पुणे – जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ८ सहस्र ४१७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील ३८ मतदान केंद्रे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे तेथे संप्रेषण (नेटवर्क) सुविधा सक्रीय नाही. अशा ठिकाणी दूरसंचार सेवा देणार्या आस्थापनांनी संप्रेषण सुविधा उपलब्ध करण्याची सूचना उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दळणवळण आराखड्याच्या समन्वय अधिकारी शमा पवार यांनी केली आहे. दूरसंचार सेवा देणार्या आस्थापनांच्या प्रतिनिधींसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत पवार बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संप्रेषण सुविधा सक्रिय असणे आवश्यक आहे. दूरसंचार सेवा आस्थापनांनी दुर्गम भागातील ३८ मतदान केंद्रांपैकी किती ठिकाणी भ्रमणभाष ‘नेटवर्क’ पोचते ? याची पडताळणी करावी. नेटवर्क उपलब्ध होत नसल्यास तशी कार्यालयास माहिती द्यावी. त्यानुसार पर्यायी व्यवस्था करता येईल.
संपादकीय भूमिकामतदान केंद्रे ठरवतांनाच तेथील नेटवर्कच्या दृष्टीने संबंधितांनी पडताळणी का केली नाही ? |