Israel strikes Iran military targets : इस्रायलचे इराणच्या सैनिकी तळांवर आक्रमण
इराणची २० सैनिकी तळं उद्ध्वस्त
तेहरान (इराण) – इराणने १ ऑक्टोबर या दिवशी इस्रायलवर केलेल्या आक्रमणाला इस्रायलने २५ ऑक्टोबरच्या रात्री प्रत्युत्तर दिले. इस्रायलने ३ घंट्यांत इराणच्या २० सैनिकी तळांना या वेळी लक्ष्य केले. यामध्ये क्षेपणास्त्र निर्मितीच्या कारखान्यांनाही लक्ष्य करण्यात आले. ही कारवाई रात्री अडीच वाजता करण्यात आली. हे आक्रमण केवळ सैनिकी तळापुरतेच मर्यादित होते. इतर ठिकाणी आक्रमणे झाली नाहीत, असा दावा इस्रायलने केला आहे. इराणची या आक्रमणात किती हानी झाली, हे समजू शकलेले नाही. आक्रमणानंतर इस्रायल, इराण, इराक आणि सौदी अरेबिया यांनी त्यांची हवाई सीमा बंद केली आहे. १ ऑक्टोबरला इराणने इस्रायलवर १८० क्षेपणास्त्रे डागली होती.
Israel’s Attack on Iran’s Military Bases
– 20 Iranian military bases destroyed.
– “We destroyed the missiles in the air!” – Iran’s claim.
– Saudi Arabia criticizes the attack.
– The U.S. warned Iran against retaliatory attacks.Israel launched a massive attack on Iran’s… pic.twitter.com/x8I6TJLD9C
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 26, 2024
इस्रायलच्या संरक्षण दलाचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितले की, १ ऑक्टोबरच्या आक्रमणाला उत्तर म्हणून इस्रायलने इराणवर आक्रमण केले आहे. इराण आणि त्याचे मध्य-पूर्वेतील सहयोगी ७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायलवर ७ आघाड्यांवर आक्रमणे करत आहेत. अशा परिस्थितीत इस्रायललाही प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. इस्रायल आणि आमच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही जे काही आवश्यक आहे, ते करू.
आम्ही हवेतच क्षेपणास्त्रे नष्ट केली ! – इराणचा दावा
इराणने आक्रमणानंतर एक निवेदन प्रसारित केले आहे. यात इराणने म्हटले आहे की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इस्रायलचे आक्रमण हाणून पाडले आहे. अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली. पडलेल्या क्षेपणास्त्रांमुळे फारच अल्प हानी झाली आहे.
🛑Israel’s Attack on Iran’s Military Bases
📌20 Iranian military bases destroyed
📌 “We destroyed the missiles in the air!” – Iran’s claim
📌 Saudi Arabia criticized the attack
📌 The U.S. warned Iran against retaliatory attacks
How did #Israel carry out the attack ❓… pic.twitter.com/0DS5vDK3fl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 26, 2024
सौदी अरेबियाने केली टीका
इराणवरील इस्रायलच्या आक्रमणावर सौदी अरेबियाने टीका केली असून हे इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय समुदायाला संघर्ष संपवण्यासाठी एकजुटीने पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेची इराणला प्रत्युत्तरादाखल आक्रमण न करण्याची चेतावणी
इराणवरील इस्रायलच्या आक्रमणानंतर दोन्ही देशांमधील थेट सैनिकी आक्रमणे थांबवली पाहिजेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. इराणने इस्रायलविरुद्ध कोणतीही प्रत्युत्तराची कारवाई न करण्याची चेतावणीही अमेरिकेने दिली आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याचे म्हणणे आहे की, इराणवर आक्रमण करण्यापूर्वीच इस्रायलने अमेरिकेला याची माहिती दिली होती.
इस्रायलने कसे केले आक्रमण ?
इस्रायलने अत्याधुनिक ‘एफ्-३५’ या लढाऊ विमानांसह १०० विमानांद्वारे इराणवर आक्रमण केले. २ सहस्र किलोमीटर प्रवास करून इस्रायलची विमाने इराणमध्ये घुसली आणि त्यांनी बाँबचा वर्षाव केला. ‘एफ्-३५’ विमानांचा वेग प्रतिघंटा १ सहस्र २०० ते २ सहस्र किलोमीटर आहे. इस्रायलची सीमा इराणशी लागून नसल्याने इस्रायलला जॉर्डन, सौदी अरेबिया किंवा सीरिया आणि इराक या देशांना पार करून इराणमध्ये जावे लागते.