BJP Bhilwara Corporator’s Husband Stabbed : भीलवाडा (राजस्थान) येथे धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण
|
भीलवाडा (राजस्थान) – येथे फटाके फोडल्याकारणाने धर्मांध मुसलमानांनी भाजपचे नेते देवेंद्र सिंह हाडा यांना चाकूने भोसकले, तसेच त्यांनी येथे दगडफेक केली आणि वाहने पेटवून दिली. या आक्रमणात हाडा यांचा पुतण्या योगेश आणि अन्य एक जण घायाळ झाले. पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना अटक केली, तर २५ जणांना कह्यात घेतले आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घायाळ झालेले देवेंद्र हाडा यांच्या पत्नी मंजू देवी येथील नगरसेविका आहेत. या घटनेविषयी हिंदु संघटना आणि भाजप यांनी २५ ऑक्टोबरला निदर्शने केली.
Mu$!im fanatics attacked Hindus in Bhilwara (Rajasthan)
BJP corporator’s husband stabbed !
4 Mu$!ims arrested
Hindus do not expect the type of attacks which happen in Bangladesh and Pakistan to happen in India’s Rajasthan ! That too on a BJP worker in a place where the BJP… pic.twitter.com/rSCf9ktbs0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 26, 2024
१. देवेंद्र सिंह हाडा हे भीमगंज पोलीस ठाण्याजवळ चहाचे दुकान चालवतात. २४ ऑक्टोबरच्या रात्री ते काही तरुणांसह त्याच्या दुकानाबाहेर फटाके फोडत होते. त्या वेळी ४० ते ५० मुसलमान तेथे पोचले आणि त्यांनी फटाके फोडण्यावर आक्षेप घेतला. यावर हाडा यांनी दिवाळीचे वातावरण असल्याने फटाके फोडत असल्याचे सांगितल्यावर अझरुद्धीन नावाच्या तरुणाने हाडा यांच्या पोटात चाकू खुपसला. या वेळी हिंदू तरुणांनी विरोध केला असता त्यांच्यावरही आक्रमण करण्यात आले.
२. या घटनेची माहिती मिळताच अन्य हिंदु आणि पोलीस तेथे पोचले असता मुसलमान पळून गेले. पोलिसांनी घायाळांना रुग्णालयात भरती केले. पोलिसांनी अझरुद्दीन लोहार, त्याचा भाऊ शाहिद, फैजान, फरदीन, खालिक लोहार यांच्यासह ४० जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
३. दुसरीकडे नगरसेविका मंजूदेवी हाडा यांनीही तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले की, मंगला चौकात जुनेद, जावेद, मोनू, युनूस, इम्रान, जफर, ओमान, जुनेद, नोमान, फिरदौस, टीना, जरीना, मुमताज, बिल्कीस आदींनी त्यांच्या घरावर लोखंडी सळ्या, काठ्या आणि दगड यांद्वारे आक्रमण केले. ते येथील लोकांना घरे रिकामी करण्याची धमकी देत होते.
४. मंगला चौकाजवळच्या नागौरी मोहल्ला येथील रहिवासी विनोद सोनी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सलीम अन्सारी, मोनू अन्सारी, युनूस, इम्रान, खालिद, बिलाल यांच्यासह अनेक मुसलमान महिलांनी दगडफेक केली.
५. महापौर राकेश पाठक यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि अपक्ष नगरसेवकांनी पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यांची भेट घेतली. ‘आरोपींना तात्काळ अटक करा’, या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. (पोलिसांना असे निवेदन का द्यावे लागते ? – संपादक)
६. नगरसेवकांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून शहरात विशेषत: हिंदूंच्या सणांवर सातत्याने आणि नियोजनबद्धरित्या आक्रमणे होत आहेत.
संपादकीय भूमिकाबांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंवर होतात, तशी आक्रमणे भारतातील राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर अन् तेही भाजपच्या व्यक्तीवर होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! |