Theft In Ordnance Factory Varangaon : जळगाव येथे ५ अत्याधुनिक रायफल्सची चोरी !
जळगाव – जिल्ह्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमधून (आयुधांच्या कारखान्यातून) ५ अत्याधुनिक रायफल्स चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
🚨 Breaking News: 3 AK-47 rifles and 2 Israeli-made Galil rifles Stolen from high security Ordnance Factory Varangaon !
FIR has been registered against unknown accused.
👉It is essential to establish accountability if these rifles are misused for any unlawful activities.… pic.twitter.com/pVM2NJNkPr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 26, 2024
१. या कारखान्यात भारतीय सैन्यासाठी एके ४७ रायफलच्या गोळ्या (काडतुसे) बनवल्या जातात. त्या सीमेवर पाठवण्याआधी त्यांची चाचणी घेतली जाते.
२. या चाचणीसाठी वापरल्या जाणार्या ५ रायफलींची शस्त्रागाराचे कुलूप तोडून चोरी झाली आहे. (अशी चोरी होतेच कशी ? शस्त्रागारासारख्या संवेदनशील आणि अतीमहत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नाही का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाया रायफल्सचा वापर गैरकृत्यासाठी केला गेल्यास त्याचे उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक आहे ! |