उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक !
पुणे – विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास इच्छुक उमेदवारांनी आरंभ केला आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडून आतापर्यंत १९ जणांनी ना हरकत प्रमाणपत्र (एन्.ओ.सी.) घेतले असून ४५ इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज केले आहेत. उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही कराची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासमवेत जोडणे बंधनकारक असते. उमेदवारी अर्ज भरणार्याकडे थकबाकी असल्यास संबंधितांकडून ती थकबाकी वसूल केली जाते. त्यानंतरच ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. थकबाकीदार उमेदवाराने अर्ज भरल्यावर इतरांनी आक्षेप घेतल्यास उमेदवाराचा अर्ज बाद ठरवला जातो.