किशोरगंज (बांगलादेश) : धर्मांध मुसलमानांनी केली कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या किशोरगंज जिल्ह्यातील प्रमाणिक तलावाच्या जवळ असलेल्या राधागोविंद मंदिरात घुसून काही धर्मांध मुसलमानांनी श्री कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड केली. ही घटना २४ ऑक्टोबरच्या रात्री घडली. या मंदिरात नवजागरण संघाने ‘श्री श्री श्यामा पूजे’चे आयोजन केले होते. किशोरगंजमध्ये हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्याची अलीकडची ही दुसरी घटना आहे. तेथील हिंदुत्वनिष्ठाने ‘सनातन प्रभात’ला यासंदर्भातील माहिती दिली. बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठांनी या घटनेचा निषेध केला आहे.
🛑 Kali Mata’s murti vandalized for the second time in Kishoreganj, Bangladesh
🚫 In a troubling turn of events last night, some miscreants broke the Devi’s vigraha on the banks of Pramanik Pond, at the Radha Govinda temple during Sri Sri Shyama Puja which was organized by… pic.twitter.com/NFT5lwh3LA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 25, 2024
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंसाठी नरकासमान बनत चाललेला इस्लामी बांगलादेश ! |