एका राज्यातील प्रतिकूल परिस्थितीत एका १७ वर्षांच्या मुलाला सनातन संस्थेचा आधार वाटणे आणि हिंदूंसाठी कार्य करण्याची तळमळ निर्माण होणे !

१. संसारात राहून साधना करण्यासाठी एका राज्यातील एका १७ वर्षांच्या मुलाने सनातन संस्थेच्या संपर्क क्रमांकावर संदेश पाठवणे  

‘काही दिवसांपूर्वी सनातन संस्थेच्या संपर्क क्रमांकावर (हेल्पलाईनवर) एका राज्यातून एक संदेश आला होता. त्यात लिहिले होते, ‘मला अध्यात्माविषयी काही प्रश्न आहेत. मला सनातन संस्थेचे सदस्य आणि साधक व्हायचे आहे; मात्र मला संन्यासी व्हायचे नाही. मला व्यवहारात राहून साधना करायची आहे.’ तो संदेश पाठवणार्‍या व्यक्तीला मी संपर्क केल्यावर तिच्याकडून मला समजले, ‘ती धर्माभिमानी व्यक्ती १७ वर्षांची असून इयत्ता १० मध्ये शिकत आहे. तिचे वडील आणि आजोबा आधुनिक वैद्य आहेत.’ त्या मुलाने सनातन संस्थेची माहिती संकेतस्थळावरून घेऊन संदेश पाठवला होता.

२. ‘आपत्काळात केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सनातन संस्था जगाला तारू शकेल’, असा विश्वास १७ वर्षांच्या मुलाला वाटणे  

तो मुलगा त्यानंतर म्हणाला, ‘‘सध्या त्या राज्यात जी हिंदूंची स्थिती आहे, त्याविषयी मला काहीतरी करण्याची इच्छा आहे. सर्व शोध घेऊन सनातन संस्था आणि डॉक्टर आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांच्याविषयी मला माहिती मिळाली. ‘पूर्ण जगात केवळ सनातन संस्था आहे, जी जगाला वाचवू शकेल आणि योग्य दिशा देऊ शकेल. असे केवळ डॉक्टर आठवले आहेत, जे आध्यात्मिक स्तरावर हे कार्य करू शकतात’; म्हणून मला त्यांचे शिष्य व्हायचे आहे. ‘मला साधना शिकायची आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल ?’, याची माहिती मला हवी आहे.’’ त्यानंतर मी त्या धर्माभिमानी मुलाला साधना आणि संस्था यांविषयी सविस्तर माहिती दिली.

‘त्या राज्यातील  प्रतिकूल परिस्थितीत एका १७ वर्षांच्या मुलाला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे शिष्य बनून हिंदूंसाठी काहीतरी करावेसे वाटणे’,  हे गुरुकृपेनेच होऊ शकते. त्या मुलाशी बोलल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

– एक साधक (१२.९.२०२४)