‘चक दे इंडिया !’ या हिंदी चित्रपटात मूळ हिंदु प्रशिक्षकाऐवजी निर्मात्याने जाणीवपूर्वक मुसलमान प्रशिक्षक दाखवला !
अभिनेते अन्नू कपूर यांनी दिली माहिती
मुंबई – काही वर्षांपूर्वी ‘चक दे इंडिया !’ नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये हॉकी प्रशिक्षकाची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटात शाहरूख खान प्रशिक्षक झाला आणि त्याचे नाव कबीर खान होते; पण प्रत्यक्षात या चित्रपटाची कथा एका हिंदु प्रशिक्षकावर आधारित होती, ज्याचे नाव मीर रंजन नेगी आहे. चित्रपट निर्मात्याने जाणीवपूर्वक हे पात्र हिंदु ऐवजी मुसलमान दाखवले, अशी माहिती चित्रपट अभिनेते अन्नू कपूर यांनी ‘ए.एन्.आय.’ (एशियन न्यूज इंटरनॅशनल) या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिली. मीर रंजन नेगी हे प्रसिद्ध हॉकीपटू होते. त्यांनी भारतीय महिला हॉकी संघाला प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने कॉमनवेल्थ स्पर्धेचे सुवर्ण पदक जिंकले होते.
“Chak De India changed the coach’s religion from Hindu to Mu$l!m,” – Annu Kapoor in Podcast, with @Connectgeeta
Mohandas Gandhi’s journey of portraying Hindus as inferior and showing Mu$l!ms in positive light has not stopped.
There is no alternative to the #HinduRashtra to stop… pic.twitter.com/fI5z24KMid
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 26, 2024
भारतात हिंदु पुजार्यांची नेहमीच थट्टा करण्याचा प्रयत्न होतो !
अन्नू कपूर पुढे म्हणाले की, भारतात नेहमीच मुसलमानांचे पात्र चांगले दिसावे आणि हिंदु पुजार्याची थट्टा करण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर पुन्हा ‘गंगा-जमुनी तहजीब’च्या (गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती) विचारांची गोष्ट सांगितली जाते. (हाच आहे हिंदी चित्रपटसृष्टीचा खरा चेहरा ! आता हिंदूंनी अशा चित्रपटांवर बहिष्कार घालणे चालू केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|