रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !
१. अधिवक्त्या (सौ.) निकिता राधे (उच्च न्यायालय), बेंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘आश्रमातील एका लहानशा फुलापासून साधकांपर्यंत सर्वांमध्ये सौम्यता आणि श्रद्धा जाणवते.
आ. प्रत्येक जिवामध्ये निर्मळ भाव जाणवतो.
इ. मी आश्रमातील ध्यानमंदिरात बसले असतांना ‘माझ्या डोक्यावर गुरुजींचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) आशीर्वादाचा हात आहे’, असे मला जाणवले.
ई. पृथ्वीवरील या आश्रमात मला ब्रह्मांडाची अनुभूती आली.’ (२९.६.२०२४)
२. अधिवक्ता कृष्णराज व्ही. काटवे, धारवाड, कर्नाटक.
अ. ‘मला आश्रमात श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले.
आ. आश्रमात जर शिबिरे आयोजित केली जात असतील, तर त्यांमध्ये सहभागी होण्यास मी इच्छुक आहे.’
(३०.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |