निवडणुकीत अवैध पैशांचा वापर

२४ घंट्यांत ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे पैसा वाटले जात आहेत. मागील २४ घंट्यांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांनी पैसे, मद्य, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदी ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

१५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत निवडणुकीच्या प्रसारासाठी अवैधरित्या वापरण्यात येत असलेली तब्बल ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त अन्वेषण यंत्रणांनी जप्त केली आहे. यामध्ये आयकर विभागाने ३० कोटी ९३ लाख ९२ सहस्र ५७३, महसूल विभागाने ८ कोटी ३० लाख ८४ सहस्र ८७८, महाराष्ट्र पोलिसांनी ८ कोटी १० लाख १२ सहस्र ८११, अमली पदार्थविरोधी पथकाने २ कोटी ५० लाख, राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ कोटी ७५ लाख ३९२, तर सीमाशुल्क विभागाने ७२ लाख ६५ सहस्र ७४५ रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. (लोकशाहीची थट्टा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आमिषे दाखवणार्‍या उमेदवारांवर कारवाई का होत नाही ?