सतत इतरांचा विचार करणारे आणि इतरांना आनंद देणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !
‘सद्गुरु राजेंद्र शिंदे प्रत्यक्ष कृतीद्वारे मला ‘प्रेमभाव म्हणजे काय ? इतरांचा विचार कसा करू शकतो ? इतरांसाठी कृती करणे आणि इतरांना आनंद देणे म्हणजे काय ?’, हे शिकवत आहेत. त्याविषयीची काही सूत्रे येथे दिली आहेत.
१. साधिका शिंदेआजींच्या सेवेसाठी रुग्णालयात थांबल्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधिकेची विचारपूस करणे
सद्गुरु राजेंद्रदादांच्या आई श्रीमती प्रभावती शिंदेआजी (वर्ष २०२४ मध्ये आध्यात्मिक पातळी ६६ टक्के आणि वय ८८ वर्षे) प्रसाधनगृहात पडल्या होत्या. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले होते. मला त्यांच्या समवेत रुग्णालयात थांबण्याची सेवा होती. सद्गुरु दादा आजींना भेटायला आल्यावर त्यांनी प्रथम मला विचारले, ‘‘तुम्हाला झोप लागली का ? काही अडचणी आहेत का ?’’ तेथील ‘स्नानगृह आणि प्रसाधनगृह व्यवस्थित आहे का ?’, हे सर्व त्यांनी स्वत:हून प्रत्यक्ष पाहिले.
२. रुग्णाईत आईंशी प्रेमाने बोलणे
सद्गुरु दादा त्यांच्या आईंशी पुष्कळ प्रेमाने बोलायचे. ते आजींना सांगायचे, ‘‘आश्रमातील साधक तुझी आठवण काढतात. त्यांना काय सांगू ?’’ आजीही त्यांना आनंदाने प्रतिसाद द्यायच्या. त्या म्हणायच्या, ‘‘मी आनंदात आहे. लवकरच आश्रमात येते.’’ त्या दोघांमधील संवाद ऐकून माझेही मन आनंदी व्हायचे.
३. प्रेमभाव
मी रुग्णालयात झोपायचे. तेथे असतांना मला सकाळी काहीच खावेसे वाटत नव्हते. मी सकाळचा अल्पाहार मागवत नव्हते. सद्गुरु दादांना याविषयी समजल्यावर त्यांनी सकाळी रुग्णालयात येतांना माझ्यासाठी त्यांच्याकडील आंबा व्यवस्थित कापून आणला. त्यांची प्रीती पाहून मला भरून आले. ‘देवाचे प्रेम किती निराळे असते !’, ते मला अनुभवायला आले.
४. प्रत्येक कृती अभ्यासपूर्वक करणे
आम्हाला रुग्णालयात आध्यात्मिक त्रास होऊ नयेत; म्हणून सद्गुरु राजेंद्रदादांनी त्यांच्याजवळच्या डबीतील विभूती कागदाने हातावर घेऊन त्यांच्या आईंना लावली आणि विभूतीचा एक कणही वाया जाऊ नये; म्हणून हाताला लागलेली विभूती स्वतःच्या शरिराला पुसली. कागदाने विभूती घेणे सोपे जाते आणि विभूती वाया जात नाही. त्या वेळी ‘सद्गुरु दादांचा विभूतीप्रति किती भाव आहे !’, हे मला अनुभवायला मिळाले. नंतर त्यांनी ती डबी विभूती लावण्यासाठी माझ्याकडे दिली. यातून ‘सद्गुरु दादा किती बारकाईने अभ्यास करून आणि इतरांचा विचार करून प्रत्येक कृती करतात’, हे माझ्या लक्षात आले.
५. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्यानुसार शिंदेआजींनी ‘रुग्णालयातील आधुनिक वैद्य, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत’, असा भाव ठेवून त्यांचे आज्ञापालन करणे
रुग्णालयात आधुनिक वैद्य आजींना भेटायला येण्यापूर्वी सद्गुरु दादा शिंदेआजींना म्हणाले, ‘‘आधुनिक वैद्य, म्हणजे परम पूज्यच तुला तपासायला येणार आहेत’, असा भाव ठेवून त्यांना नमस्कार कर. तुला जे सांगायचे, ते त्यांनाच सांग आणि ते सांगतील, तसे आपण करूया.’’ त्या वेळी लहान बाळाला समजावून सांगितल्याप्रमाणे सद्गुरु दादा शिंदेआजींना सांगत होते. आजींनीही त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती केली. आजींनी उतारवयातही सद्गुरु दादांचे आज्ञापालन केले.
६. रुग्णाईत आईला प्रोत्साहन देणे
आजींची स्थिती थोडी सुधारली की, सद्गुरु दादा लगेच त्यांचे छायाचित्र काढायचे आणि ते आजींनाही दाखवायचे. ते ‘प्रतिदिन त्यांच्या आईंच्या स्थितीत कशी सुधारणा होत आहे ?’, याचा स्वत: अभ्यास करत होते. ‘आई, तू आता किती बरी झालीस !’, असे कौतुक करून ते आजींना प्रोत्साहन द्यायचे.
‘भगवंत सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्यक्ष त्याचे रूप अनुभवायला देत आहे आणि तोच प्रत्यक्ष कृतीतून शिकवत आहे’, याबद्दल भगवंताच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. अंजली झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
साधिकेने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी केलेली काव्यरूपी प्रार्थना आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधिकेसाठी भगवंताजवळ केलेली प्रार्थना !१. साधिकेने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी केलेली काव्यरूपी प्रार्थना !जन्म घेतला एका अहंयुक्त जिवाने । सोडवले त्याला मायेतील संसारातून । अडकला असेल जरी हा जीव । प्रयत्नांची दिशा दाखवून । किती अभागी समजत असे । ‘तू एक भाग्यवान’ असशी । सद्गुरु दादा, आपल्या प्रीतीच्या । आजच्या या वाढदिवसानिमित्त । ‘स्वभावदोष आणि अहं अन् त्रास । अखंड प्रक्रिया (टीप) राबवता यावी । सद्गुरु दादा, आपल्या कोमल चरणी भावपूर्ण नमस्कार ! टीप – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न २. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधिकेसाठी भगवंताजवळ केलेली प्रार्थना !हे भगवंता, अंजलीताईंची ओंजळ । त्यांच्या मनात येत असणारे । कोणतीही गोष्ट मनाप्रमाणे करण्याची । त्यांची ओंजळ सकारात्मकतेने । ३. साधिकेने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !आज या जिवाचे भाग्य उजळले । किती हे भगवंताचे प्रेम । – सौ. अंजली झरकर |