लहान वयातही परिपूर्ण सेवा करणारा कु. पार्थ सुनील घनवट (वय १७ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. पार्थ सुनील घनवट (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के) यांचा आज आश्विन कृष्ण दशमी (२६.१०.२०२४) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कु. पार्थ घनवट

कु. पार्थ घनवट यांना १७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. लहान असूनही परिपूर्ण सेवा करणे  

पार्थ वयाने लहान असूनही तो मोठ्या साधकांप्रमाणे सेवा करतो. त्याने लहान वयात गुरुप्राप्तीसाठी केलेला त्याग पाहून मला त्याच्याविषयी कृतज्ञता वाटते. तो सर्व सेवा मनापासून स्वीकारतो आणि पूर्ण करतो. तो सेवेतील अडचणी लगेच विचारून घेतो.

२. व्यष्टी साधनेचे गांभीर्य 

तो सेवा करून थकला असला, तरी व्यष्टी साधना पूर्ण करूनच झोपतो. यातून त्याचे व्यष्टी साधनेविषयीचे गांभीर्य लक्षात येते.

– श्री. राजेश दोंतूल, सोलापूर (१०.७.२०२२)