‘कॅनडामध्‍ये राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघावर बंदी घाला !’

कॅनडातील न्‍यू डेमोक्रॅटिक पार्टीच्‍या (एन्‌डीपीच्‍या) खासदारांची पुन्‍हा एकदा मागणी !

जगमीत सिंह (डावीकडे ) (सौजन्य : ET)

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील न्‍यू डेमोक्रॅटिक पार्टीच्‍या (एन्.डी.पी.च्‍या) खासदारांनी पुन्‍हा एकदा राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाला ‘आतंकवादी’ संघटना संबोधत तिच्‍यावर बंदी घालण्‍याची मागणी केली आहे. कॅनडामध्‍ये परकीय हस्‍तक्षेपाच्‍या सूत्रावर कॅनडाच्‍या संसदेत तातडीची बैठक झाली, त्‍यात ही मागणी करण्‍यात आली. एन्.डी.पी.चे खासदार मॅकफर्सन यांनी भारताला शस्‍त्रास्‍त्रे विकणे बंद करण्‍याची मागणी केली.

१. न्‍यू डेमोक्रॅटिक पार्टीचे (एन्.डी.पी.चे) खलिस्‍तानी विचारसरणीचे नेते जगमीत सिंह म्‍हणाले की, कॅनडाने यापुढे भारतासमवेत माहितीची देवाणघेवाण करू नये. कॅनडाच्‍या नागरिकांबद्दलची गुप्‍त माहिती एखाद्या देशाला आणि सरकारला देऊ नये. रा.स्‍व. संघ हिंसक, अतिरेकी उजव्‍या विचारसरणीची संघटना आहे. ती खोलवर फूट पाडणारी आहे आणि कॅनडासह जगभरात तिच्‍या शाखा आहेत. तिच्‍यावर बंदी घातली पाहिजे. (खलिस्‍तानी आतंकवादी आणि खलिस्‍तान समर्थक जणू काही अहिंसेचा प्रसार करत आहेत, असे या पक्षाला वाटत आहे ! – संपादक)

२. या बैठकीत ट्रुडो यांच्‍या लिबरल पक्षाचे खासदार रणदीप सराय म्‍हणाले की, मी कॅनडातील हिंदूंना स्‍पष्‍टपणे सांगू इच्‍छितो की, हे शीख किंवा हिंदु असे सूत्र नाही. हे कॅनडा विरुद्ध भारत सरकार असे सूत्र आहे. भारताकडून परकीय हस्‍तक्षेप सर्वाधिक आहे. हा हस्‍तक्षेप चीन, रशिया किंवा इराण यांच्‍यापेक्षा खूप वरच्‍या स्‍तरावर आहे.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवादी संघटना आणि खलिस्‍तानी आतंकवादी यांच्‍यावर नव्‍हे, तर प्रखर भारतप्रेमी संघटनेवर बंदी घालण्‍याची मागणी करणार्‍यांवर भारतानेच बंद घातली पाहिजे !