गोशाळेचा देखभाल खर्च द्यावा आणि त्यांची योग्य निगा राखावी !
बैल सोपवतांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा शेतकर्याला आदेश !
धुळे – जळगाव जिल्ह्यातील मोरड येथील शेतकरी गजानन राठोड यांनी बैल विकत घेतले. त्यांच्याकडून बैलांची वाहतूक निर्दयीपणे होत असल्याचे कारण देत गुन्हा नोंदवून बैल कह्यात घेतले. ते गोशाळेत पाठवले. या प्रकरणी शेतकर्याने दोंडाईचा न्यायालयात याचिका प्रविष्ट केली; मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. शेतकर्याने जिल्हा आणि सत्र न्यायालयात धाव घेतली. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकूण घेत न्यायालयाने बैल मूळ मालकाला परत करण्याचे आदेश दिले. मालकाने बैलांची योग्य निगा राखावी, तसेच न्यायालयाने मागितल्यावर बैल सादर करावेत, तसेच बैलांची ठराविक रक्कम न्यायालयात जमा करावी, असा आदेश दिला आहे. तसेच बैल गोशाळेत सांभाळण्यात आल्याने त्यासाठी बैल मालकाने गोशाळेला प्रत्येक बैलासाठी ५ सहस्र रुपयांप्रमाणे रक्कम जमा करण्याचा आदेश दिला आहे.