आरोपी मुआज पाटणकरचे हॉटेल आणि चिकन सेंटर त्वरित बंद करा !
आतंकवादी संघटनांना पैसा पुरवल्याचे प्रकरण हिंदु राष्ट्र समन्वय समितीची प्रशासनाकडे मागणी
चिपळूण, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – आतंकवादी संघटनांना पैसा पुरवल्याच्या गुन्ह्यात आतंकवादविरोधी पथकाने कारवाई करून अटक केलेल्या मुआज रियाज पाटणकर याचे सावर्डे येथे चालू असलेले ‘हॉटेल दानिश’ आणि सावर्डे बाजारपेठेतील ‘चिकन विक्री दुकान’ या गुन्ह्याचा न्यायालयीन निकाल लागेपर्यंत त्वरित बंद करण्यात यावेत, यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने २४ ऑक्टोबरला येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी प्रांताधिकारी लिगाडे म्हणाले, ‘‘हा आतंकवादाशी संबंधित देशद्रोहाचा गुन्हा असल्याने प्रशासन निवेदनातील मागणी त्वरित संबंधित यंत्रणेला कळवेल. अशा स्वरूपाच्या गुन्ह्याबद्दल प्रशासनही संवेदनशील असते.’’
या निवेदनात म्हटले आहे की,
१. देशभरातील काही राज्यातील संशयित गुन्हेगार एकत्रित येऊन केलेला संशयित गुन्हा पहाता आतंकवादी संघटनांना आर्थिक साहाय्य करण्याची हीसुद्धा माध्यमे असू शकतात.
२. अशी दुकाने चालू राहिल्यास तेथून आणखी देशविघातक षड्यंत्रे रचली जाऊ शकतात.
३. या गंभीर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी अशा दुकान किंवा हॉटेल यांचा वापर केला जाऊ शकतो, या शंकेला वाव आहे.
या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने माजी सैनिक श्री. रवींद्र मोरे, सावर्डे येथील शिवसेना विभागप्रमुख श्री. प्रदीप चव्हाण, सर्वश्री सुदेश कांबळी, प्रशांत परब, देवेंद्र चव्हाण, मुसाड येथील रघुनाथ सुर्वे, चंद्रशेखर शिंदे, दसपटी विभाग युवक मंडळाचे सुधीर शिंदे, भाजपचे विक्रम जोशी, मनसे शहराध्यक्ष अभिनव भुरण, हिंदु जनजागृती समितीचे सुरेश शिंदे, विजय सकपाळ, राम जंगम आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाप्रशासनाकडे अशी मागणी का करावी लागते ? खरेतर प्रशासनाने स्वत:हूनच आतंकवाद्यांशी संबंधित असणार्या आरोपीची दुकाने बंद करण्याची कृती करणे जनतेला अपेक्षित आहे ! |