कोल्हापूर जिल्ह्यात विविध आस्थापनांना भेटी देऊन हलाल प्रमाणित उत्पादने न विकण्याचे आवाहन !
हिंदु जनजागृती समितीचे दिवाळीनिमित्त हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात अभियान
कोल्हापूर – हिंदु जनजागृती समितीने यंदा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात अभियान आरंभले आहे. या अंतर्गत समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यात विविध आस्थापनांना भेटी देऊन या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. जयसिंगपूर येथे ‘डी मार्ट’चे व्यवस्थापक जॉन राजरंगनाथन यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे, शहर उपाध्यक्ष श्री. महेश पोरे, स्वयंरोजगार विभागाचे शहर उपसंघटक श्री. सुमंत रत्नपारखे, संभाजीपूर शाखाध्यक्ष श्री. महेश माने, भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्री. राजेंद्र दाईंगडे, शहर सरचिटणीस श्री. सुनिल ताडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. संजय घाटगे यांसह अन्य उपस्थित होते.
याच मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर येथे ‘डी मार्ट’ आणि ‘स्टार बझार’ यांना देण्यात आले. या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, सकल हिंदु समाजाचे श्री. अभिजीत पाटील, हिंदु महासभेचे श्री. राजू तोरस्कर आणि श्री. विकास जाधव, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, महिंद्र अहिरे, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.