सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त झालेल्या चामुंडादेवीच्या यागाच्या वेळी राजस्थान येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्रीमती अर्चना लढ्ढा, सोजत, राजस्थान.

१ अ. ‘सनातनच्या सर्व साधकांचे त्रास दूर व्हावेत’, यासाठी महर्षींच्या आज्ञेने याग होत असल्याने वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही’, असे वाटणे : मला शारीरिक आणि अन्य काही त्रास अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे मला एका ज्योतिषाने सांगितले होते, ‘‘तुम्ही १ – २ वेळा श्री दुर्गासप्तशतीचे होमहवन करा.’’ तेव्हा माझ्या मनात ‘सनातनच्या सर्व साधकांचे त्रासांपासून रक्षण व्हावे’, यासाठी महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात यज्ञ केले जातात. तेव्हा मला वेगळे काही करण्याची कदाचित् आवश्यकता भासणार नाही, तरीही ‘हवन करावे लागले, तर विश्वसनीय पुरोहित मिळेल का ?’, असे विचार येत होते.

१ आ. ब्रह्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या चामुंडादेवीच्या यागामुळे साधिकेला झालेला लाभ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चामुंडादेवीचा याग झाला. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. या २ दिवसांत माझे अन्य ठिकाणी बाहेर जाण्याचे नियोजनही होते; मात्र गुरुकृपेने मी दोन्ही दिवस यागाचे संगणकीय प्रक्षेपण पाहू शकले. नंतर मला जाणवले, ‘वास्तूमधील त्रास आणि दाब न्यून झाला आहे.’ ‘माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती सुधारत आहे’, असे मला आतूनच अनुभवता येत आहे. त्याबद्दल मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

२. श्री. दीपक लढ्ढा, सोजत, राजस्थान.

अ. ‘यज्ञाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मला पुनःपुन्हा श्री दुर्गादेवीचे स्मरण होत होते. ‘देवीने माझ्या शरिराला तेज प्रदान केले आहे’, असे मला वाटले.’

३. सौ. आशा राठी, जयपूर, राजस्थान

३ अ. कुलदेवीच्या दर्शनाला गेल्यावर ‘तेथे होणार्‍या हवनाचा लाभ घ्यावा’, असे वाटणे; मात्र रेल्वेगाडीची वेळ झाल्याने तेथे थांबू न शकणे : ‘काही दिवसांपूर्वी आम्ही आमची कुलदेवी ‘श्री सत्चितमाते’च्या दर्शनाला गेलो होतो. तेव्हा तेथे हवनाची सिद्धता चालू होती. तेव्हा ‘हवनासाठी थांबावे’, असे मला तीव्रतेने वाटत होते; पण आमच्या रेल्वेगाडीची वेळ लवकरची असल्यामुळे मी तेथे थांबू शकले नाही.

३ आ. रामनाथी आश्रामतील यज्ञाच्या वेळी भावजागृती होणे आणि ‘श्री सत्चित्मातेने इच्छा पूर्ण केली’, अशी कृतज्ञता वाटणे : ब्रह्मोत्सवानिमित्त रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चैतन्यमय उपस्थितीत याग झाला झाला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मला वाटले,

‘श्री सत्चित्मातेने माझी इच्छा चांगल्या प्रकारे पूर्ण केली.’ तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझा कृतज्ञताभाव दाटून आला. मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

४. श्रीमती कुसुम भार्गव (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८० वर्षे), जयपूर, राजस्थान.

४ अ. याग चालू असतांना सुगंधाची अनुभूती येणे : ‘१५.५.२०२३ या दिवशी याग होत असतांना मला ३ वेळा दिव्य सुगंध आला. ‘मला २ वेळा कशाचा सुगंध येत आहे ?’, हे माझ्या लक्षात आले नाही. तिसर्‍या वेळी मला गुलाबाच्या सूक्ष्म गंधाची जाणीव झाली.

४ आ. यागाच्या वेळी माझा ‘निर्विचार’ हा नामजप २ घंटे सतत होत होता.’

४ इ. सुखासनावर अधिक वेळ बसू न शकणे; मात्र यागाच्या वेळी अधिक वेळ बसूनही त्रास न होणे आणि पाठदुखीही बरी होणे : मी सुखासनावर (सोफासेटवर) अधिक वेळ बसल्यास माझ्या पाठीत दुखू लागते. मला सलग ४ – ५ घंटे बसणे शक्य होत नाही; मात्र यज्ञाच्या वेळी मी सुखासनावर अधिक वेळ बसूनही मला कसलाच त्रास झाला नाही. माझा पाठदुखीचा त्रास दूर झाला.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २०.५.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील
    म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक