Bangladesh Sacked Hindu Police : बांगलादेशात १०० हून अधिक हिंदु पोलिसांंना नोकरीतून केले बडतर्फ !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात शेख हसीना यांना सत्ताच्युत करून पलायन करण्यास भाग पाडण्यात आल्यावर हिंदूंवरील अत्याचार अल्प झालेले नाहीत. येथील महाविद्यालयांतील हिंदु प्राध्यापकांना बलपूर्वक त्यागपत्र देण्यास भाग पाडल्यानंतर आता सरकारी नोकर्यांमधील हिंदूंना काढण्यात येत आहे. ‘व्हॉईस ऑफ बांगलादेश’ या ‘एक्स’ खात्यावरून दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १०० हून अधिक हिंदु पोलीस अधिकार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
Hindu police officers who are dismissed from Bangladesh Police are well educated and trained. So request India give them visa and train them in your RAW. It will be best for your country.
We Want #Revenge……— Voice of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VHindus71) October 24, 2024
या माहितीनंतर सामाजिक माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यामध्ये म्हटले जात आहे की, बांगलादेशात पूर्णतः नरसंहाराची सिद्धता चालू आहे. त्यात पहिली पायरी म्हणजे पोलीस आणि सैन्य यांना संपवण्याचे कार्य चालू आहे.
संपादकीय भूमिकाएकीकडे बांगलादेशात ही स्थिती आहे, तर दुसरीकडे भारतात अधिकाधिक मुसलमानांना सरकारी नोकर्यांमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत ! |