उद्योजकांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान देणे आवश्यक ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योग समूहाचे मालक

दापोलीत झाली उद्योजक बैठक !

डावीकडून श्री. परेश गुजराथी, सद्गुरु सत्यवान कदम, उपस्थितांना संबोधित करतांना श्री. रवींद्र प्रभुदेसाई आणि डॉ. हेमंत चाळके

दापोली, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – व्यवसाय करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परिस्थितीतून ताणतणाव निर्माण होत असतात. ठरवलेली उद्दिष्टे काही वेळा पूर्ण होत नाहीत, अशा वेळी नैराश्य येते. मीही या परिस्थितीतून गेलो आहे; मात्र सनातन संस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार साधना अनुसरल्याने मला लाभ झाला. त्यामुळे उद्योजक आणि व्यावसायिक यांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पितांबरी उद्योग समूहाचे मालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.

तालुक्यातील जालगाव ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उद्योजक बैठकीत ते बोलत होते. तालुक्यातील ४० जणांनी या बैठकीचा लाभ घेतला. प्रारंभी समितीच्या कार्याची यशोगाथा श्री. परेश गुजराथी यांनी विशद केली. सूत्रसंचालन श्री. प्रतीक टेमकर यांनी केले.

सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान हिंदुत्वनिष्ठ श्री. सुरेश रेवाळे यांनी केला. श्री. प्रभुदेसाई यांचा सत्कार गव्हे येथील उद्योजक श्री. लक्ष्मण गुरव यांनी केला.

शास्त्र समजून घेऊन साधना केल्यास आनंदप्राप्ती होईल ! – सद्गुरु सत्यवान कदम, सनातनचे धर्मप्रचारक

आपल्या जीवनात येणार्‍या दु:खामागे ८० टक्के आध्यात्मिक कारण असते. त्यामुळे केवळ साधनेच्या माध्यमातूनच ही दु:खे दूर केली जाऊ शकतात. यासाठी योग्य शास्त्र समजून घेऊन साधना केल्यास आनंदप्राप्ती निश्चित होईल.

बैठकीला उपस्थित उद्योजक आणि व्यायसायिक

‘हलाल’सक्ती ही भारतीय राज्यघटनेने दिलेले धर्मस्वातंत्र्य आणि ग्राहक अधिकार यांच्या विरोधात ! – डॉ. हेमंत चाळके, हिंदु जनजागृती समिती

जागतिक अर्थव्यवस्थेवर मुसलमानांना राज्य करता यावे, यासाठी हलाल प्रमाणपत्र मांसासमवेत अन्य गोष्टींसाठी लागू करण्यात आले आहे. ‘खाद्य पदार्थांपासून वस्त्र,औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी सर्वच हलाल प्रमाणित असायला हवीत’, या मागणीमुळे अनेक व्यावसायिकांना हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यामुळे हिंदूंनाही ही उत्पादने घ्यावी लागतात. ‘हलाल’ सक्ती ही भारतीय राज्यघटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य आणि ग्राहक अधिकार यांच्या विरोधात असून यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जनजागृती करण्यासाठी ‘हलाल’मुक्त दीपावली’ या मोहिमेस आरंभ करण्यात आला आहे.

विशेष :

  • १. उपस्थित उद्योजक आणि व्यावसायिक यांनी ‘हलाल’ मुक्त दिवाळी साजरी करण्याचा दृढ निर्धार केला.
  • २. बाजारपेठेतील व्यापार्‍यांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रबोधन करण्याचे ठरवण्यात आले.