दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना जिवे मारण्याची धमकी; खाडीत सहस्रो मासे मृत
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना जिवे मारण्याची धमकी
जालना – मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘इच्छुक उमेदवार म्हणून येणार आणि गेम करणार (ठार मारणार)’, अशी धमकी यूट्यूब वाहिनीच्या टिपणीतून बजाज बिष्णोई लीडर नावाच्या बनावट खात्यावरून अज्ञाताने दिली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
खाडीत सहस्रो मासे मृत
पालघर – येथील खाडीमध्ये सहस्रोंच्या संख्येने मासे मृत झाले. प्रदूषित पाण्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मच्छीमार समुदायाने याविषयी खेद व्यक्त केला आहे. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात या संदर्भात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाजलचरांचे जीवन धोक्यात आणणार्यांना शिक्षा व्हायला हवी ! |
खंडणी मागणार्याला अटक !
मुंबई – मुंबई वाहतूक पोलिसांच्या साहाय्य क्रमांकावर धमकीचा संदेश आला आहे. संबंधिताने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी झारखंडमधील २४ वर्षीय तरुणाला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने टीव्ही पाहून सलमानला धमकवण्याचा कट रचून संदेश पाठवला होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
रेल्वेतून पडून तरुणीचा मृत्यू !
अंबरनाथ – रात्री ८.३० वाजता ठाणे-कर्जत रेल्वेतून प्रवास करतांना पुष्कळ गर्दी असल्याने ऋतुजा गणेश जंगम (वय २८ वर्षे) अंबरनाथला गाडीतून उतरली आणि पुन्हा गाडीत चढली; पण गर्दीमुळे तिचा हात सुटला आणि ती रेल्वेतून खाली पडली. या वेळी घायाळ झाल्याने तिचा मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकाअजून किती मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासन वाढत्या गर्दीवर उपाययोजना काढणार आहे ? |
२ महिला दलालांना अटक !
पनवेल – तळोजा येथे बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय करणार्या २ महिला दलालांना अटक करण्यात आली आहे. हसीना खान आणि सालिया खान अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या कह्यातून एका बांगलादेशी पीडितेची सुटका केली आहे.
संपादकीय भूमिकाअशांवर कठोर कारवाई करायला हवी ! |