शिवसेना उद्धव ठाकरे गटातून ६५ उमेदवार घोषित !

उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या ६५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली आहे. यात नवे आणि जुने उमेदवार आहेत. काँग्रेसच्या काही मतदारसंघांमध्येही उद्धव ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार दिले आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघात वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यानंतर काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांच्याकडे तो गेला. त्यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांचे तिकीट कापले गेले आहे. त्यानंतर झिशान सिद्दिकी हे महायुतीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.