वाझे यांचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज फेटाळला !

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होऊ देण्याच्या मागणीसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने २३ ऑक्टोबरला फेटाळला. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) विशेष न्यायालयात अर्ज करून वाझे यांना प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास आरंभी संमती दिली होती.

सीबीआयने देशमुखांविरोधात केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यास विशेष न्यायालयाने अनुमती दिली. त्यानंतर वाझे यांनी तसा अर्ज केला होता. ईडीने नंतर ही संमती मागे घेतली.