विधानसभा निवडणुकीतही ‘घड्याळ’ चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला !
मुंबई – अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्यास संमती देऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वाेच्च न्यायालयात याचिका केली होती. २४ ऑक्टोबर या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही ‘घड्याळ’ चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वापरता येणार आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ‘घड्याळ’ चिन्ह देण्यात येऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने २ ऑक्टोबर या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात याचिका केली होती. अजित पवार यांच्या पक्षाला ‘घड्याळ’ चिन्ह देतांना त्यासमवेत चिन्ह निर्णयाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचनाही लिहिणे बंधनकारक केले आहे. ही सूचना लिहिण्याविषयी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला आहे.