धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ला पाठिंबा
सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेचा निर्णय
पिंपरी (पुणे) – आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ला पाठिंबा देण्याचा निर्णय ‘सामाजिक सलोखा ऐक्य परिषदे’त घेण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मुफ्ती अहमद हसन कासमी यांनी दिली. परिषदेच्या वतीने २३ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
कासमी म्हणाले, ‘‘गेल्या ११ वर्षांपासून निवडणूक काळात देशभर जाती-धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून मतांची मागणी केली जात आहे. त्यामुळे अल्पसंख्यांकांसह सर्व छोट्या सामाजिक घटकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.’’