Madhya Pradesh : मध्यप्रदेश सरकार बलात्कार पीडित मुलींना प्रतिमहा ४ सहस्र रुपये साहाय्य देणार
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील भाजप सरकार अल्पवयीन बलात्कार पीडित गर्भवती मुली, तसेच बलात्कारातून जन्मलेली मुले यांच्यासाठी लवकरच एक योजना चालू करणार आहे. ही योजना केंद्र सरकारच्या निर्भया निधीतून चालवली जाईल. पीडितेचे वय २३ वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत (जे आधी असेल) तिच्या पालनपोषणासाठी प्रतिमहा रुपये ४ सहस्र रुपये दिले जातील.
निर्भया निधीतून प्रत्येक जिल्ह्याला १० लाख रुपये दिले जातील. ही रक्कम जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्यांच्या संमतीने पीडितांना साहाय्य करण्यासाठी खर्च करता येईल.