ग्राहक भावेश शहा आणि महापालिकेचे कर्मचारी नितीन आळंदे यांसह संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंद करा !
|
सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – मार्चमध्ये नियमबाह्य आणि अनधिकृत पद्धतीने पाणीपुरवठा करणारी नळ जोडणी करणार्या प्रकरणातील ग्राहक भावेश शहा आणि ही नळजोडणी करणारे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी नितीन आळंदे यांच्यासह संबंधित सर्वच जणांवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अनेक मासांपासून या संदर्भात पाठपुरावा करूनही महापालिकेतील संबंधित अधिकार्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने महापालिका कार्यालयासमोर पुन्हा ‘आमरण उपोषण’ करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. विनायक येडके यांनी निवेदनात दिली आहे. निवेदन देतांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उमाकांत कार्वेकर, शिवसैनिक सर्वश्री चेतन गायकवाड, रणजित जाधव, कृष्णा वडगावे, सुजोत कांबळे, अभिषेक पाटील आदी उपस्थित होते.