RSS leader Indresh Kumar : वक्फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालत असून बोर्ड भ्रष्टाचाराचा अड्डा आहे !
रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचा आरोप
नवी देहली – वक्फ बोर्डाविषयी आता मुसलमान समुदायालाच असे वाटते की, वक्फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालते आणि हे बोर्ड नाही, तर भ्रष्टाचाराचा अड्डा आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केले.
इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की,
१. आपल्या देशात कुठल्याही भूमीविषयीचा निर्णय न्यायालये घेत आली आहेत. आता वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचे सूत्र उपस्थित झाले आहे, तर याचा निर्णय वक्फ बोर्डच करणार, असे कसे काय चालेल ? जर वक्फ बोर्डाने या विधेयकाच्या विरोधात निर्णय दिला, तर तो अंतिम निर्णय आहे, असे मानले जाईल. तसेच अनेक मालमत्तांवर चुकीच्या पद्धतीने नियंत्रण मिळवण्यात आल्याचेही दिसते आहे.
२. जर मुसलमान धर्मीय सोडून इतर धर्माच्या लोकांनीही वक्फ बोर्डाकडे भूमी दिल्या आहेत, तर मग वक्फ बोर्डात इतर धर्मियांना प्रतिनिधित्व का द्यायचे नाही ? वक्फ बोर्डाचे दायित्व निश्चित करणे, वक्फ बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणणे आणि मुसलमानेतर व्यक्तींची नियुक्ती करून सामाजिक सौहार्दता वाढवणे हे ३ उद्देश या सुधारणा विधेयकामागे आहेत.
संपादकीय भूमिकाअसे वक्फ बोर्ड विसर्जित करून त्याद्वारे भूमी लाटणार्या संबंधितांवर सरकारने कारवाई करणे आवश्यक ! |