सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘वाईट शक्तींचा जोर न्यून झाल्यावर नामजपादी उपाय करावे लागणार नाहीत’, हे लक्षात घेऊन आता गांभीर्याने उपाय करा !
सौ. अंजली श्रीपाद अरगडे (वय ६१ वर्षे) : मला ३ घंटे नामजपादी उपाय करायला सांगितले आहेत; पण मी नामजपाला जाण्याचा कंटाळा करते आणि सेवाच करत रहाते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : वाईट शक्तींचा जोर न्यून झाला की, तुम्हाला नामजपादी उपाय करावे लागणार नाहीत. मग तुमचे पूर्ण आयुष्य सेवेसाठीच आहे; म्हणून आता नामजपाला महत्त्व द्या. नामजप झाल्यावर सेवा करा; अन्यथा वाईट शक्ती त्यांचा जोर आणखी वाढवतात आणि आपला त्रास वाढतो. मग आपल्याला काहीच करता येत नाही आणि उपायांसाठी पुष्कळ वेळ द्यावा लागतो.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |