‘शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ हे नामजप करतांना कोणता भाव ठेवायचा ?’,  याविषयी ईश्वराने सुचवलेले विचार !

‘अनेक साधकांची विविध देवतांवर श्रद्धा असल्यामुळे त्यांना ‘शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ’ हे नामजप करतांना ‘कोणता भाव ठेवायचा ?’, हे ठाऊक नसते. त्यामुळे त्यांना नामजप करणे कठीण जाते. ‘वरील नामजप करतांना आपण कोणता भाव ठेवू शकतो ?’ याविषयी भगवंताने सुचवलेले विचार येथे लेखबद्ध केले आहेत.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. देवांच्या नामजपांचे प्रकार 

१ अ. देवतांचे सगुण आणि निर्गुण रूपांचे नामजप : देवतांचे नामजप हे ईश्वराच्या सगुण रूपाशी संबंधित आहेत, तर ‘शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ’ हे नामजप ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाशी निगडित आहेत.

१ आ. देवतांच्या सगुण आणि निर्गुण रूपांच्या नामजपांचे महत्त्व : देवतांच्या सगुण नामजपांतून देवतांच्या सगुण रूपाच्या नामाचा जप होत असतो, तर त्यांच्या निर्गुण नामजपांतून त्यांचे गुण आणि त्यांची आध्यात्मिक अवस्था व्यक्त होत असते.

२. भगवान श्रीकृष्णाच्या सगुण आणि निर्गुण नामजपांचा अर्थ अन् ते करत असतांना ठेवायचा भाव 

आपली उपास्यदेवता श्रीकृष्ण असेल, तर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप भगवान श्रीकृष्णाच्या सगुण रूपाशी संबंधित आहे, तर ‘शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ’ हे नामजप श्रीकृष्णाच्या निर्गुण रूपाशी संबंधित आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या सगुण रूपाचा नामजप करत असतांना ‘आपण भगवंताच्या चरणी नामजपरूपी प्रत्येक पुष्प वहात आहोत’, असा भाव ठेवून नामजप करू शकतो. तसेच भगवान श्रीकृष्णाचे निर्गुण रूपाशी संबंधित असणारे नामजप करतांना आपण पुढील भाव ठेवू शकतो.

३. निर्गुणाशी संबंधित नामजप, कशाचे सूचक असणे आणि नामजप करतांना ठेवायचा भाव

साधक वरीलप्रमाणे ईश्वराच्या निर्गुण रूपाशी संबंधित असणारा नामजप करत असतांना त्यांच्या उपास्यदेवतेप्रती श्रीकृष्णाप्रमाणे भाव ठेवून नामजप करू शकतात. त्यामुळे निर्गुणाचे नामजपही भावपूर्ण होण्यास साहाय्य होईल.

कृतज्ञता

‘श्री गुरुकृपेमुळे भगवंताच्या निर्गुण रूपाशी संबंधित असणार्‍या नामजपांचा आध्यात्मिक अर्थ आणि महत्त्व उमजले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.