Hasina’s  Student Union Banned : बांगलादेशात शेख हसीना यांच्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेवर बंदी

‘बांगलादेश छात्र लीग’वर बंदी

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाची विद्यार्थी संघटना ‘बांगलादेश छात्र लीग’वर बंदी घातली आहे. वर्ष २००९ च्या आतंकवादविरोधी कायद्याच्या तरतुदींनुसार ही बंदी घालण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाने प्रसारित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, बांगलादेश स्वतंत्र झाल्यापासून, विशेषत: गेल्या १५ वर्षांच्या हुकूमशाही राजवटीत, ‘बांगलादेश छात्र लीग’ या विद्यार्थी संघटनेला सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका असल्याचे मानले जात आहे. या कारवायांमध्ये गंभीर गोष्टींचा समावेश आहे. हत्या, महाविद्यालय परिसरामध्ये छळ, विद्यार्थी वसतिगृहात गैरव्यवहार, बलात्कार आणि लैंगिक छळ यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांचा समावेश आहे.

(‘कुत्र्याला पिसाळलेले म्हणा आणि गोळ्या घाला’, असे नेहमीच म्हटले जाते. तसाच प्रकार बांगलादेशातील सरकार करत आहे, असेच यावरून म्हणावे लागेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

बांगलादेशात आता लोकशाही नाही, तर हुकूमशाही चालू असल्याने तेथे अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. याविषयी जागतिक मंचांवरूनही कुणी बोलत नाही; कारण यामागे अमेरिका आहे !