Derogatory  Remarks On Sriram : भगवान श्रीराम-सीतामाता यांच्‍यावर मुसलमान मुलाने केली अश्‍लील टिपणी !

हिंदूंमध्‍ये संतापाची लाट

घटनेच्‍या निषेधार्थ शेकडो ग्रामस्‍थांनी रस्‍त्‍यावर उतरून मोर्चा काढला

गांधीनगर (गुजरात) – जिल्‍ह्यातील सदरा गावात एका १६ वर्षीय मुसलमान मुलाने भगवान श्रीराम आणि सीतामाता यांच्‍यावर केलेल्‍या आक्षेपार्ह आणि अश्‍लील टिपणीनंतर संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्‍या निषेधार्थ शेकडो ग्रामस्‍थांनी रस्‍त्‍यावर उतरून पोलीस ठाण्‍यापर्यंत मोर्चा काढला. पोलिसांनीही तत्‍परता दाखवत आरोपी मुलाला कह्यात घेतले. या वादानंतर गावात पूर्ण बंदची घोषणा करण्‍यात आली आहे. या मुलाने नेमकी काय टिपणी केली, हे समजू शकलेले नाही.

१. या घटनेनंतर गावातील अनुमाने २०० ते ३०० लोकांनी चिलोडा पोलीस ठाणे गाठून आरोपींवर कडक कारवाई करण्‍याची मागणी केली. (हिदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍यावर हिंदू नेहमीच वैध मार्गाने विरोध करतात, तर धर्मांध मुसलमान कायदा हातात घेऊन हिंसाचार करतात ! – संपादक)

२. गावातील रहिवासी राजेश पटेल म्‍हणाले, ‘‘या घटनेने आमच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या आहेत.’’ गावात शांतता राखण्‍यासाठी पोलिसांनी बंदोबस्‍त वाढवला आहे.

३. बजरंग दलाचे प्रमुख गणपत सिंह यांनी या प्रकरणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्‍याची सूचना कार्यकर्त्‍यांना केली आहे.

४. बजरंग दलाच्‍या आवाहनावर गावात एक दिवसाचा बंद पाळण्‍यात आला. गाव व्‍यापारी संघटनेचे अध्‍यक्ष रमेश चौधरी म्‍हणाले, ‘‘आमच्‍या धर्माचा अपमान झाला आहे, म्‍हणून आम्‍ही स्‍वेच्‍छेने आमची दुकाने बंद ठेवली आहेत.’’

आरोपीच्‍या पालकांनी मागितली क्षमा !

या घटनेनंतर आरोपी मुलाच्‍या पालकांनी गावचे सरपंच आणि हिंदु संघटना यांना क्षमा करण्‍याचे आवाहन केले. आपला मुलगा अल्‍पवयीन असून त्‍याने नकळत हे कृत्‍य केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. (हे नकळत केलेले कृत्‍य नसून लहानपणापासून मुसलमान मुलांना जे कट्टरतावादी शिक्षण दिले जाते, त्‍याचा हा परिणाम आहे ! – संपादक)  

संपादकीय भूमिका

हिंदूंच्‍या देवतांचा लहान वयात अवमान करणारा मुसलमान मुलगा हा भविष्‍यातील जिहादी आहे, हे लक्षात घेऊन त्‍याला शिक्षा होण्‍यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्‍यक !