Anti-National DMK : द्रमुकच्या नकाशात जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवला !
तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे देशद्रोही कृत्य !
चेन्नई : तमिळनाडूतील सत्ताधारी ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ (द्रमुक) च्या ‘एनआरआय’ (अनिवासी भारतीय) शाखेने ‘एक्स’ वर ‘पोस्ट’ प्रसारित केल्यानंतर एका नवीन वादाला तोंड फुटले. या ‘पोस्ट’मध्ये दाखवण्यात आलेल्या भारताच्या नकाशात जम्मू आणि काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवण्यात आला आहे.
A map released by the DMK shows Jammu and Kashmir as a part of #Pakistan !
This is nothing but a treasonous act by the ruling DMK party of Tamil Nadu!
Such parties should be de-recognised and their leaders should be prosecuted for treason!#POJK #JammuAndKashmir #JammuKashmir… pic.twitter.com/srdmBkQL46
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 24, 2024
सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर ही ‘पोस्ट’ द्रमुकने हटवली. तमिळनाडूतील भाजपचे राज्य सचिव डॉ. एस्.जी. सूर्या यांनीही द्रमुक सरकारवर टीका केली.
திராவிட மாடல் ஆட்சியில் கல்வியைப் போல் பொருளாதாரத்திலும் வளர்ந்து வரும் தமிழ்நாடு! @arivalayam @DMKITwing #DravidianModel #EconomicGrowth pic.twitter.com/ozhvpWhkvT
— DMK NRI Wing (@DMKNRIWing) October 23, 2024
१. द्रमुक पक्षाने भारताच्या नकाशाचे चुकीचे चित्रण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्ष २०२० मध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांनी एका व्हिडिओमध्ये हीच चूक केली होती.
Not the first time #DMK does this. Previously in 2020 #UdhaynithiStalin made the same mistake in a video & after I filed a complaint with then Police Commissioner he deleted the video where Indian map was misrepresented.
No wonder #DMK & DMKTards are fond of Pakistan. pic.twitter.com/Vwd9w83IJq
— Dr.SG Suryah (@SuryahSG) October 23, 2024
२. डीएमके भारताची भौगोलिक अखंडता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप डॉ. सूर्या यांनी केला.
३. वादग्रस्त नकाशामुळे सध्या चालू असलेल्या राजकीय वादळात आणखी भर पडली आहे, काही लोकांनी त्याचा संबंध उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील मागील विधानांशी जोडला आहे. उदयनिधी यांनी पूर्वी टिपणी केली होती की, प्राचीन सनातन परंपरेचे ‘निर्मूलन’ करणे आवश्यक आहे.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ छापण्यामागे लोकांच्या राष्ट्रीय भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाअशा पक्षांची मान्यता रहित करून त्यांच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे ! |