सांगली येथे घरातून सोन्याचे दागिने पळवले

सांगली, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील जामवाडीमधील बंगल्यात घुसून दुसर्‍या मजल्यावरील कपाटात ठेवलेले ३ लाख ४० सहस्र रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने पळवले आहेत.

या प्रकरणी यशवंत साळुंखे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.