बसखाली सापडून तरुणीचा मृत्यू !
पुणे – दुचाकी घसरल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या युवतीच्या डोक्यावरून पी.एम्.पी. बसचे चाक गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
नवी सांगवी येथील बाबुराव घोलप महाविद्यालयाजवळ रात्री ९ वाजता ही घटना घडली. अमृता महादेव नाईक (वय २१ वर्षे) असे मृत दुचाकीस्वार युवतीचे नाव आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या ब्लॉकवरून तिची दुचाकी घसरली. त्यामुळे तेथील लोखंडी कुंपणावर दुचाकी आदळली. या वेळी मागून येणार्या पी.एम्.पी. बसचे डाव्या बाजूकडील मागचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी बसचालक आणि वाहक यांना कह्यात घेतले असून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे.