मुसलमान पुरुषाला एकापेक्षा अधिक निकाह (विवाह) करण्याचा अधिकार असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्वाळा

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – मुसलमान पुरुषाला एकापेक्षा अधिक निकाह करण्याचा अधिकार इस्लामच्या वैयक्तिक (शरियत) कायद्याने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी कायद्याच्या अंतर्गत त्याची नोंदणी करून घ्यावी लागेल, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले.

ठाणे महापालिकेने एका मुसलमान पुरुषाच्या अल्जेरियन महिलेसमवेत केलेल्या तिसर्‍या निकाहची नोंदणी करण्यास नकार दिल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. महाराष्ट्र विवाह मंडळाने त्याचा अर्ज फेटाळला होता; परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याच्या तिसर्‍या निकाहची नोंदणी महापालिकेला करावी लागणार आहे. यापूर्वी दुसरा निकाह त्याने मोरोक्कोचे नागरिकत्व असलेल्या महिलेशी केला आहे.