यज्ञांचे महत्त्व आणि त्यांचे लाभ अधोरेखित करणारी साधिकेला आलेली अनुभूती

‘वर्ष २०२४ च्या ऑक्टोबर मासात नवरात्रीच्या दिवसांत रामनाथी (गोवा) येथील  सनातन संस्थेच्या आश्रमात प्रतिदिन देवीच्या विविध यज्ञांचे आयोजन करण्यात आले होते. मला या यज्ञांच्या झालेल्या लाभाविषयीची अनुभूती येथे दिली आहे.

श्रीमती अलका वाघमारे

१. नवरात्रीच्या कालावधीत शारीरिक स्वास्थ्य चांगले नसल्याने यज्ञस्थळी जाता न येणे 

‘नवरात्रीनिमित्त ९ दिवस करण्यात येणार्‍या यज्ञांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा’, यासाठी आश्रमातील सर्व साधक प्रतिदिन यज्ञ चालू झाल्यानंतर दीड-पावणे दोन घंटे यज्ञस्थळी बसायचे. त्या काळात माझे शारीरिक स्वास्थ्य चांगले नसल्याने मला अत्यंत थकवा होता. त्या वेळी ‘यज्ञस्थळी जाता येईल आणि अधिक काळ बसता येईल’, असा आत्मविश्वास माझ्यात नव्हता. त्यामुळे मला यज्ञस्थळी जाता येत नव्हते. मी नवरात्रीचे आरंभीचे पाच दिवस यज्ञस्थळी न जाता कसेबसे ढकलले.

२. यज्ञस्थळी गेल्यानंतर यज्ञाच्या चैतन्यामुळे झालेले लाभ  

षष्ठीच्या दिवशी मात्र मला रहावेना. श्री गुरूंना आणि आई जगदंबेला प्रार्थना करत मी यज्ञस्थळी गेले. त्यानंतर मला पुढील अनुभूती आल्या.

अ. त्या दिवशी मी यज्ञसमाप्तीपर्यंत जवळजवळ २ घंटे बसू शकले.

आ. यज्ञसमाप्तीनंतर मला एकदम उत्साही वाटू लागले.

इ. माझ्या हातापायांत बळ आले.

ई. माझ्या मनाची स्थितीही आणखी चांगली झाली. एकप्रकारचा आत्मविश्वास माझ्यामध्ये आला.

उ. यज्ञानंतर मी पायर्‍या चढून दुसर्‍या मजल्यावर जाऊ शकले. त्या वेळी मला किंचितही धाप लागली नाही, पायात गोळे आले नाहीत कि अन्य कोणताही त्रास झाला नाही. (एरवी मला दोन जिने चढून जातांना धाप लागते.) मी मधे न थांबता सलग दोन जिने चढू शकले.

ऊ. माझ्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली.

अशा प्रकारे मला यज्ञाच्या चैतन्याचा लाभ झाला. ‘यज्ञांचे महत्त्व आणि त्यांचे लाभ माझ्या मनावर पुन्हा एकदा अधोरेखित झाले’, यासाठी मी श्री गुरूंच्या आणि आई जगदंबेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती अलका वाघमारे (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१०.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक