पुणे शहरात बेकायदा पिस्तुले बाळगणार्‍यांच्या संख्येत वाढ !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड – चालू वर्षात आतापर्यंत बेकायदा पिस्तुले बाळगल्याप्रकरणी १०७ गुन्हे नोंद असून १४७ पिस्तुले जप्त केली आहेत, तर १६७ जणांना अटक केली आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण होण्यासाठी शहरात पिस्तुले, कोयते, तलवारी बाळगणार्‍यांची संख्या वाढली आहे. पोलिसांकडून कारवाई करून ही शस्त्रे जप्त केली जात आहेत. शहरात गुन्हेगारी वर्चस्वासाठी शस्त्रे बाळगण्याकडे कल वाढला आहे. बेकायदा शस्त्रे बाळगणे ही प्रतिष्ठा समजून गुन्हेगारीकडे वळणार्‍यांची संख्या वाढत आहे.

संपादकीय भूमिका

ही स्थिती पोलिसांची अकार्यक्षमता दर्शवते ! पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कठोर प्रयत्न करणे आवश्यक !