Chahatt Khanna GharWapsi : बुद्धीभेदामुळे मुसलमानाशी विवाह करून इस्लाम स्वीकारणार्‍या हिंदु अभिनेत्रीचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

फरहान मिर्झा व अभिनेत्री चाहत खन्ना

मुंबई – मला इस्लामकडे नेण्यासाठी माझा बुद्धीभेद करण्यात आला होता. आता सनातन धर्मात परत आल्याने मला फार आनंद झाला आहे. ‘हिंदु धर्मातील प्रत्येक पैलू चुकीचा आहे’, असे मला सांगितले गेले, अशी माहिती अभिनेत्री चाहत खन्ना यांनी एका मुलाखतीत दिली. ‘टेलिटॉकइंडिया’ या वाहिनीला दिलेल्या ४३ मिनिटांच्या मुलाखतीत चाहत खन्ना बोलत होत्या. यात चाहत खन्ना यांनी फरहान मिर्झा याच्याशी लग्न केल्यानंतर इस्लाम स्वीकारणे आणि त्यानंतर पुन्हा सनातनमध्ये येणे, याची संपूर्ण माहिती दिली.

चाहत खन्ना यांनी वर्ष २००६ मध्ये उद्योगपती भरत नरसिम्हानी यांच्याशी लग्न केले; मात्र नंतर त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर चाहत यांनी फरहान मिझाशी लग्न केले. चाहतने इस्लाम धर्म स्वीकारला होता. दोघांना २ मुली आहेत. वर्ष २०१८ मध्ये चाहत यांनी फरहानशी घटस्फोट घेतला.

चाहत खन्ना म्हणाल्या की,

१. मी श्री कालीदेवीची आणि श्रीकृष्णाची भक्त आहे. घटस्फोटानंतर माझ्या मूळ धर्मात परत यायला मला अनुमाने ४-५ वर्षे लागली; कारण माझा इस्लामवर विश्‍वास आहे. मला अजूनही इस्लाममधील काही गोष्टी आवडतात; (बुद्धीभेदाचा अजूनही परिणाम चाहत खन्ना यांच्यावर असल्याचेच यातून दिसून येते, असे कुणी म्हटले, तर आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक) पण तरीही मी माझ्या मुळांकडे परत आले. मी स्वतःला भाग्यवान समजते.

२. मी भरकटले होते. जेव्हा लहान असतांना ‘तू जे करत आहेत ते चुकीचे आहे’ असे कुणी सांगितल्यामुळे आपल्यावर त्याचा प्रभाव पडतो. त्यानंतर आपण चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. माझ्या संदर्भात असेच घडले आहे; पण मी सनातनमध्ये परत आले.