Giriraj Singh Hindu Swabhiman Yatra : हिंदूंनी स्‍वसंरक्षणासाठी भाला, तलवार आणि त्रिशूळ घरात ठेवावे ! – गिरिराज सिंह, केंद्रीय मंत्री

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

पाटलीपुत्र (बिहार) – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी बिहारमध्‍ये हिंदू स्‍वाभिमान यात्रा काढली आहे. बिहारच्‍या किशनगंज जिल्‍ह्यात यात्रेच्‍या वेळी लोकांना संबोधित करतांना त्‍यांनी हिंदूंना, ‘घरामध्‍ये भाला, तलवार आणि त्रिशूळ ठेवावे’, असे आवाहन केले. ‘या आयुधांची शुद्धी करून त्‍यांची पूजा करा आणि आवश्‍यकता पडल्‍यास स्‍वसंरक्षणासाठी त्‍यांचा वापर करा’, असे ते म्‍हणाले.

गिरिराज सिंह म्‍हणाले की,

१. हिंदु समुदाय धोक्‍यात आहे आणि त्‍याला संघटित होण्‍याची आवश्‍यकता आहे. मी येथे (किशनगंजमध्‍ये) येण्‍यापूर्वी अररिया, कटिहार आणि पूर्णिया या जवळच्‍या जिल्‍ह्यांना भेट दिली आहे.

२. सर्वत्र लोकांनी त्‍यांच्‍या बहिणी आणि मुली यांच्‍या सन्‍मानाविषयी माझ्‍याकडे चिंता व्‍यक्‍त केली. मला सांगण्‍यात आले की, प्रतिवर्षी अनेक हिंदु मुली ‘लव्‍ह जिहाद’च्‍या शिकार होत आहे. त्‍यानंतर त्‍यांचे धर्मांतर (इस्‍लाम) केले जाते.

३. मला हे कळले आहे की, ज्‍या ठिकाणी मुसलमानांची संख्‍या हिंदूंपेक्षा अधिक आहे, तेथे हिंदूंच्‍या मंदिरांची तोडफोड केली जाते आणि महिलांनी सिंदूर लावणे यांसारख्‍या धार्मिक प्रथांमध्‍ये हस्‍तक्षेप केला जातो.

४. या भागांत ख्रिस्‍ती मिशनरीही सक्रीय आहेत; मात्र मुसलमान केवळ हिंदूंनाच लक्ष्य करत आहेत.