McDonald Burger Infection In US : अमेरिका – मॅकडोनाल्डचा बर्गर खाल्ल्याने ४९ जणांना ‘ई-कोलाई’ आजाराचा संसर्ग !

एक जण मृत्यूमुखी

वॉशिंग्टन (अमेरिका) – मॅकडोनाल्डचा ‘क्वार्टर पाऊंडर हॅमबर्गर’ नावाचा पदार्थ खाल्ल्यामुळे अमेरिकेतील किमान ४९ जणांमध्ये ‘ई-कोलाई’ या आजाराची लक्षणे उद्भवली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. एक जण मृत्यूमुखी पडल्याची बातमी आहे.

१. अमेरिकेत किमान १० राज्यांत या आजाराचा संसर्ग झाला असून सर्वाधिक २७ प्रकरणे कोलोराडो राज्यात, तर ९ प्रकरणे नेब्रास्का राज्यात नोंदवण्यात आली.

२. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, सप्टेंबरच्या शेवटासापासून नागरिकांमध्ये ई-कोलाई आजाराची लक्षणे दिसू लागली. यांपैकी अनेकांनी मॅकडोनाल्डचा ‘क्वार्टर पाऊंडर हॅमबर्गर’ खाल्ल्याचे समोर कआले.

३. अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) विभागाने अन्वेषण चालू केले असून ‘क्वार्टर पाऊंडर हॅमबर्गर’मधील सिल्वर ओनियन आणि ‘बीफ’ (गोमांस), यांमुळे हा आजार होत असावा, असे प्राथमिक निरीक्षण नोंदवले आहे. ही प्रकरणे समोर आलेल्या राज्यांमध्ये या पदार्थाच्या विक्रीवर तात्पुरती बंदीही आणण्यात आली आहे.

‘ई-कोलाई’ आजाराची लक्षणे !

ताप, उलट्या, घसा कोरडा पडणे, लघवी न होेणे, चक्कर येणे, अशा लक्षणांचा समावेश आहे. यासह काही जणांमध्ये मूत्रपिंडाच्या समस्याही उद्भवू शकतात. संक्रमणानंतर ३-४ दिवसांनी ही लक्षणे दिसू लागतात.

संपादकीय भूमिका

भारतात गल्ली-बोळांत मॅकडोनाल्डची मोठमाठी दुकाने असून दक्षतेचा उपाय म्हणून सरकारने येथील पदार्थांची पडताळणी करणे आवश्यक आहे !