Pune Bangladeshi Infiltrators Arrested : पुणे येथे २१ बांगलादेशी नागरिकांना पकडले !
आरोपींना २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
पुणे – नगर रस्त्यावरील रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात अवैध वास्तव्य करणार्या २१ बांगलादेशी नागरिकांना पुणे ग्रामीण पोलिसांची आतंकवादविरोधी शाखा आणि रांजणगाव पोलीस यांनी पकडले. त्यांच्याकडे वास्तव्य करण्यासाठी लागणारी कागदपत्रे सापडली आहेत. न्यायालयाने त्यांना २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्याकडे रहिवाशासाठी लागणारे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड आदी कागदपत्रे सापडली असून त्यांना कागदपत्रे कुणी दिली ?, याचे अन्वेषण करण्यात येत आहे. (बांगलादेशी नागरिकांना सर्व कागदपत्रे पुरवणार्या संबंधितांवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
या कारवाईत १५ पुरुष, ४ महिला, २ तृतीयपंथीय यांना कह्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून मतदान कार्ड जप्त करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी नागरिकांची वाढती घुसखोरी रोखण्यासाठी पोलीस कठोर उपाययोजना कधी करणार ? |