South Korea Warns North Korea : रशियाला साहाय्य करणे बंद करा, अन्यथा युक्रेनला आम्ही शस्त्रे पुरवू !

दक्षिण कोरियाची उत्तर कोरियाला चेतावणी

सेऊल (दक्षिण कोरिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये चालू असलेल्या युद्धाला २ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्याच वेळी युक्रेनविरुद्धच्या युद्धात उत्तर कोरियाने रशियाला साहाय्य केल्याचा आरोप झाल्यानंतर दक्षिण कोरियाने ‘आम्ही युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवण्याचा विचार करू शकतो’, असे म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या हेरांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनसमवेतच्या युद्धात रशियाला साहाय्य करण्यासाठी उत्तर कोरियाने १२ सहस्र सैनिक पाठवले आहेत.

युक्रेनविरुद्धच्या युद्धात साहाय्य केल्यामुळे रशिया उत्तर कोरियाला उच्च शस्त्रास्त्रांचे तंत्रज्ञान भेट म्हणून देऊ शकतो, अशी भीती दक्षिण कोरियाच्या अधिकार्‍यांना वाटत आहे. ज्यामुळे दक्षिण कोरियाला लक्ष्य करणार्‍या उत्तर कोरियाच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांना चालना मिळू शकते.