चारचाकीत सापडले २२ लाख रुपये !

पुणे पोलिसांची कारवाई  

पुणे – येथील हडपसर रस्त्यावर नाकाबंदीच्या वेळी पोलिसांना एका चारचाकी वाहनात २२ लाख रुपये सापडल. आचारसंहितेमुळे पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. त्या वेळी हा प्रकार उघड झाला. ही रक्कम किराणामाल दुकानाच्या घाऊक व्यापार्‍याचे देयक असल्याचे संबंधितांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे. याआधीही खेड-शिवापूर पथकर नाक्यावर ५ कोटी रुपये सापडले होते.