पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या खोलीत गेल्यावर आलेल्या अनुभूती
१. दधीचिऋषींनी स्वतःचा देह वज्र बनवण्यासाठी दिला होता, तसा पू. दातेआजींनी स्वतःचा देह संशोधनासाठी दिल्याचे जाणवणे
‘पू. दातेआजींच्या (सनातन संस्थेच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) खोलीत प्रवेश केल्यावर त्यांच्याकडे पाहून मला ऋषींचे स्मरण झाले. ‘त्यांच्या अंतर्मनामध्ये ऋषींचा वास आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर देवाने मला सुचवले, ‘पू. आजी दधीचिऋषींप्रमाणे आहेत. ज्याप्रमाणे दधीचिऋषींनी आपला देह वज्र बनवण्यासाठी अर्पण केला होता, त्याप्रमाणे पू. दातेआजी यांनी त्यांचा देह गुरुदेवांच्या अनमोल आणि बुद्धीअगम्य संशोधनासाठी अर्पण केला आहे.’ तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२. पू. दातेआजी यांच्या खोलीत गेल्यावर आलेल्या अनुभूती
अ. पू. आजींच्या खोलीत गेल्यावर माझे मन निर्विचार झाले. मला वातावरणात आनंद आणि शांती यांची स्पंदने पुष्कळ प्रमाणात जाणवत होती.
आ. पू. आजींकडे पाहून मला वाटले, ‘पू. आजी आपल्याकडे पहातील का ?’ त्याच क्षणी पू. आजींनी काही क्षण डोळे उघडले आणि आम्हा सर्व साधकांकडे पाहिले.
इ. त्यांच्या देहाकडे पाहिल्यावर ‘त्या २४ घंटे परमेश्वराच्या अनुसंधानात असून त्यांच्या मनात कोणतीच इच्छा राहिलेली नाही’, असे मला जाणवले.
परात्पर गुरुदेवांनी अशी संतरत्ने घडवून त्यांचे चैतन्य आणि त्यांची बुद्धीअगम्य लीला अनुभवायला दिली. यासाठी त्यांच्या चरणी आणि पू. आजींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ’
– परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१६.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |