अपार प्रीतीचा सागर असलेल्या श्रीसत्शक्ति बिंदाताई ।
श्रीसत्शक्ति बिंदाताई (टीप)।
अपार प्रीतीचा सागर आहात तुम्ही ।।
सर्व साधकांची आई आहात तुम्ही ।
सर्व साधकांचा आधारही आहात तुम्ही ।। १ ।।
आपल्या वाणीतून चैतन्य मिळतसे आम्हाला ।
आपल्या दृष्टीक्षेपाने, त्रासदायक आवरणही क्षणार्धात निघून जात असे ।।
आपले चैतन्यमय रूप बघूनी, मन भरून येत असे ।
अशी अपार प्रीती सदैव, आम्हा साधकांवर आपली असे ।। २ ।।
सेवा करतांना जरी स्मरण केले आपुले ।
तरी सेवेसाठी उत्साह क्षणार्धात मिळत असे ।।
आपल्या स्मरणाने त्रासावर सहज मात करता येत असे ।
अशी अपार प्रीती सदैव, आम्हा साधकांवर आपली असे ।। ३ ।।
सतत विचार करता आपण साधकांचा ।
सतत विचार असतो आपला साधकांना पुढे घेऊन जाण्याचा ।।
सतत तळमळ असते आपली प्रत्येक साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीची ।
साधकांवर सदैव आपली, असे अशी अपार प्रीती ।। ४ ।।
टीप –श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
– श्री. शार्दुल चव्हाण, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग (२३.१.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |